नवी दिल्ली- दिल्ली विमानतळावर सीआईएसएफच्या जवानांनी एका महिलेकडून ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तृषा मोंडल, असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ती दिल्ली एयरपोर्टवरून कोलकत्याला जायला निघाली होती. यावेळी चेकिंगदरम्यान सीआयएसएफच्या टीमने तीला अटक केली.
नवी दिल्ली विमानतळावर महिलेकडून ५ जिवंत काडतुसे जप्त - Trisha Mondal
दिल्ली विमानतळावर सीआयएसएफच्या जवानांनी एका महिलेकडून ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तृषा मोंडल, असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
![नवी दिल्ली विमानतळावर महिलेकडून ५ जिवंत काडतुसे जप्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3770871-thumbnail-3x2-rt.jpg)
सीआयएसएफचे प्रवक्ता हेमेंद्र सिंह यांनी सांगितले, आरोपी महिला ही एअर इंडियाच्या एएल-७६४ या फ्लाईटने दिल्लीहून कोलकत्त्याला जाण्यासाठी विमानतळाच्या टर्मिनस क्र. ३ वर आली होती. त्यावेळी एक्सरे मशीनमध्ये तिची बॅग चेक केली असताना त्यात ५ जिवंत काढतूसे आढळून आली. महिलेला यासंदर्भात डॉक्युमेंट्स मागितले गेले. मात्र, ते तीला सादर करता आले नाही. तसेच या बाबतीत समाधानकारक उत्तरही देता आले नाही. यामुळे सीआयएसएफच्या जवानांनी तीला अटक केली. त्यानंतर तीच्यावर आर्म्स अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी तृषा मोंडल काढतुसांना कोलकत्यात कुठे घेऊन जाणार होती व त्याचा काय उपयोग करणार होती, याबाबत तिच्याशी अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी केली जात आहे.