वाराणसी - विजयादशमीच्या दुसर्या दिवशी नटली इमली परिसरात जगप्रसिद्ध 'भारत मिलाप' साजरा केला जातो. ४७५ वर्ष जूनी परंपरा असलेला हा कार्यक्रम सोशल डिस्टंन्सिगसह पार पडला असून कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमाला जास्त गर्दी नव्हती. ही ५ मिनिटांची लीला पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक याठिकाणी उपस्थित राहतात.
वाराणसी येथे पार पडला जगप्रसिद्ध 'भारत मिलाप' कार्यक्रम - भरत मिलाप
जगप्रसिद्ध 'भारत मिलाप' कार्यक्रम वाराणसी येथे पार पडला. उत्तर प्रदेशमध्ये हा कार्यक्रम लक्खा मेळावा म्हणून ओळखला जातो.
वाराणसी येथे पार पडला जगप्रसिद्ध 'भारत मिलाप' कार्यक्रम
उत्तर प्रदेशमध्ये हा कार्यक्रम लक्खा मेळावा म्हणून ओळखला जातो. याची सुरुवात मेघा भगत यांनी 475 वर्षांपूर्वी केली होती. त्यांनी सुरू केलेला हा मेळावा आजही संपूर्ण भक्तीभावाने साजरा केला जातो. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने जास्त गर्दी होऊ नये याकरीता या कार्यक्रमाची जागा बदलण्यात आली होती. त्यामुळे बडा गणेश येथील मैदानात हा कार्यक्रम पार पडला.