नवी दिल्ली : भारतीय हवाई सेनेने केलेल्या 'एअर स्ट्राईक'ला वर्षही पूर्ण झाले नाही, तेवढ्यात पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तब्बल चाळीस ते पन्नास दहशतवादी सध्या तिथे प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये काही आत्मघातकी दहशतवाद्यांचाही (सुसाईड बॉम्बर्स) समावेश आहे.
बालाकोट दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय; 'जैश'च्या ४०-५० दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू - बालाकोट पुन्हा सक्रिय
एअर स्ट्राईक केल्यापासून भारताच्या गुप्तचर यंत्रणा या तांत्रिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून बालाकोटवर लक्ष ठेऊन होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तब्बल चाळीस ते पन्नास दहशतवादी सध्या तिथे प्रशिक्षण घेत आहेत.
Balakot reactivated
गेल्या महिन्यातच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जाहीर केले होते, पाकिस्तान बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात आहे. यावर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने बालाकोटवर एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते.