रांची - स्थलांतरीत कामगारांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्यामुळे ४० जण जखमी झाले आहेत. ही बस मुंबईहून पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्याकडे निघाली होती. रांचीमधील सिकिदिरी घाटामध्ये ही दुर्घटना घडली.
स्थलांतरीत मजूरांना नेणारी बस दरीत कोसळली; ४० जखमी.. - रांची स्थलांतरीत मजूर अपघात
स्थलांतरीत कामगारांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्यामुळे ४० जण जखमी झाले आहेत. रांचीमधील सिकिदिरी घाटामध्ये ही दुर्घटना घडली.
![स्थलांतरीत मजूरांना नेणारी बस दरीत कोसळली; ४० जखमी.. 40 migrant workers injured](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7340939-775-7340939-1590401849695.jpg)
स्थलांतरीत मजूरांना नेणारी बस दरीत कोसळली; ४० जखमी..
या अपघातातील १७ गंभीर जखमी मजूरांना रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर, किरकोळ जखमी झालेल्या मजूरांवर घटनास्थळीच प्रथमोपचार करण्यात आले आहे. हे सर्व कामगार वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.