सितामढी (बिहार) -महाराष्ट्रातील 40 कुटुंब बिहारमध्ये झूमरचा व्यापार करण्यासाठी गेले होते. कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली आणि हे सर्व लोक बिहारमधील सितामढी जिल्ह्यात अडकून पडले आहेत. यातल्या अकोला जिल्ह्यातील काहींनी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. घरी जावू द्या, अशी आर्त विनवणी हे मजूर करत आहेत.
बिहारमध्ये अडकले महाराष्ट्रातील 40 कुटुंब; घरी परतण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या - sitamadhi corona update
महाराष्ट्रातील 40 कुटुंब बिहारमध्ये झूमरचा व्यापार करण्यासाठी गेले होते. कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली आणि हे सर्व लोक बिहारमधील सितामढी जिल्ह्यात अडकून पडले आहेत.
महाराष्ट्रातील 40 कुटुंब बिहारमध्ये अडकले; घरी परतण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
पोलीस अधीक्षक अनिल कुमार यांच्या सूचनेनुसार डुमरा पोलीस ठाण्याचे प्रभारींनी नागिरकांची भेट घेतली. त्यांची चौकशी करून त्यांना डाळ, तांदूळ, तेल कांदे, बटाटे अशा अत्यावश्याक बाबी दिल्या. होळीच्यावेळी झूमर विक्रीसाठी राज्यातील 40 कुटुंब बिहारमध्ये गेले होते.