महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमधील नवगछियात दोन ट्रकचा अपघात; 4 जण जागीच ठार - बिहार

बिहपूर येथून येणारा ट्रक आणि कटिहार येथून येणाऱ्या ट्रकची खरीक चौकाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला

4-people-died-in-road-accident
बिहारमधील नवगछियात दोन ट्रकचा अपघात; 4 जण जागीच ठार

By

Published : May 2, 2020, 12:20 PM IST

भागलपूर- बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात काल रात्री नवगछिया येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर खरीक चौक बाबा ट्रान्सपोर्ट जवळ दोन ट्रकचा अपघात झाला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नालंदा येथील दोन तर झारखंडमधील दोघांचा समावेश आहे. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

बिहपूर येथून येणारा ट्रक आणि कटिहार येथून येणाऱ्या ट्रकची खरीक चौकाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये नालंदा येथील गुंजन कुमार, सुनील कुमार आणि झारखंड मधील गोपाल पांडेय आणि उषा देवी यांचा समावेश आहे.

झारखंडमधून गोपाल पांडेय आणि उषा देवी ट्रकमधून पाटणा येथे जात होते, अशी माहिती आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details