पाटणा :बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये लष्कर आणि माओवाद्यांदरम्यान चकमक झाली. यामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच, माओवाद्यांच्या लपण्याच्या जागेवरुन काही हत्यारे, आणि आयईडी जप्त करण्यात आले आहे.
सशस्त्र सेना बलाचे (एसएसबी) पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास, वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाजवळ ही चकमक झाली. याठिकाणी माओवादी लपले असल्याची माहिती एसएसबीला मिळाली होती. त्यामुळे त्याठिकाणी शोधमोहीम सुरू असताना माओवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला, तर चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.