महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशा: सुरक्षा दलांच्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार, 1 जवान जखमी - चार नक्षलवादी ठार कंधामल

कंधामल जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना स्पेशल ऑपरेशन ग्रुपने ठार केले आहे. एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले, असे अधिकृत वक्तव्य ओडिशा पोलिसांनी जारी केले.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 9, 2020, 10:36 PM IST

भूवनेश्वर - ओडिशातील कंधामल जिल्ह्यात सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले आहेत. यावेळी कारवाईत एक जवानही जखमी झाला आहे.

'कंधामल जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना स्पेशल ऑपरेशन ग्रुपने ठार केले आहे. एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले, असे अधिकृत वक्तव्य ओडिशा पोलिसांनी जारी केले.

सुरक्षा दलांनी गुप्त माहितीच्या आधारे कलाहंडी-कंधामल सीमेवर शोध मोहिम राबविली. स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि डिस्ट्रिक्ट व्हालिंटरी फोर्सने कारवाईत सहभाग घेतला होता. सकाळी ११ च्या दरम्यान चकमक सुरू झाली. नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. सुमारे अर्धा तास गोळीबार सुरू होता, असे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गोळीबारानंतर आणखी कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details