महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानच्या चुरू येथे आगीत जळून ४ चिमुकल्यांचा मृत्यू - राजस्थान

आगीत मृत्यू झालेल्या चारही मुलांचे वय ६ वर्षे असून त्यात २ मुली आणि २ मुलांचा समावेश आहे. आग गावातील लालाराम यांच्या झोपड्यात लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच गावातील लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

Four children die fire churu
जळालेल्या मुलांचे दृश्य

By

Published : Mar 17, 2020, 9:43 PM IST

चुरू (राजस्थान)- एकाच परिवारातील ४ मुलांचा आगीत जळाल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सरदारशहर तालुक्यातील ढाणी कालेरा या गावात आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

आगीत मृत्यू झालेल्या चारही मुलांचे वय ६ वर्षे असून त्यात २ मुली आणि २ मुलांचा समावेश आहे. आग गावातील लालाराम यांच्या झोपड्यात लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच गावातील लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हेही वाचा-मध्यप्रदेश सत्तापेच : आम्हाला कैद केलेले नाही.. सिंधियांसोबत राहण्याचा बंडखोर आमदारांचा निर्धार

ABOUT THE AUTHOR

...view details