महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुड न्यूज: केरळात दिवसभरात 36 जण कोरोनामुक्त, नव्या रुग्णसंख्येत घट - केरळ कोरोना बातमी

राज्यात आत्तापर्यंत 364 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 123 जण पूर्णता बरे झाले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

pinarayi vijayan
पिनराई विजयन

By

Published : Apr 12, 2020, 7:24 PM IST

तिरूवअनंतपूरम - केरळमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 36 रुग्ण बरे झाले असून फक्त 2 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. ही राज्याची चिंता कमी करणारी बातमी आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात आत्तापर्यंत 364 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 123 जण पूर्णता बरे झाले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सुरवातीला कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली होती. मात्र, राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या उपाय योजनांना यश आल्याचे दिसून येत आहे. मात्र, राज्यात अजूनही 1 लाख 16 हजार 941 जण देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. 816 रुग्णालयांत त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

देशभरात कोरोनाचे 8 हजार 356 रुग्ण आढळून आले आहेत. तर 273 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 716 जण पूर्णत: बरे झाले आहेत. युरोपीयन देशांपेक्षा भारतामधील परिस्थिती चांगली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाचे 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details