जयपूर -राजस्थानमध्ये आतापर्यंत तबलिगी जमातीचे 35 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 2 दिवसांमध्ये कोरोनाबाधित संख्या वाढतच असून राज्यात एकूण 154 कोरोनाबाधित आढळले आहेत.
राजस्थानमध्ये तबलिगी जमातीचे 35 जण कोरोनाबाधित - corona positives in rajasthan
राजस्थानमध्ये आतापर्यंत तबलिगी जमातीचे 35 जण कोरोनाबाधित आढळले आहेत
गेल्या 12 तासांमध्ये तब्बल 21 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये जयपूर येथून 12 तर बिकानेर येथील 7 जणांचा समावेश आहे. हे सर्व जण तबलिगी जमातीचे आहेत. कोणालाही संक्रमन पसरवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे प्रत्येकाने पुढाकार घेऊन रुग्णालयात दाखल व्हावे. तसेच डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून आपले प्राण वाचवत आहेत. त्यांच्याशी गैरवर्तन केल्यास ते सहन केले जाणार आहे, असे आरोग्य मंत्री रघू शर्मा म्हणाले.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 6 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मरकझमध्ये सामिल झालेल्या लोकांचा शोध घेणे सुरु आहे.