लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये रविवारी वीज पडून 35 जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वीज पडून कानपूर आणि फतेपूरमध्ये 7, झाशी 5, जालाऊन 4, हमीरपूर 3, गाझीपूर 2 आणि पठाणगडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये वीज पडून एकाच दिवशी 35 जणांचा मृत्यू - lighting
उत्तर प्रदेशमध्ये रविवारी वीज पडून एकाच दिवशी 35 जणांचा मृत्यू झाला आहे. योगी सरकारकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.
विज पडून
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबींयाबद्दल दु:ख व्यक्त केले असून प्रत्येक कुटुंबाला 4 लाख रुपये मदत देण्याचे घोषित केले आहे. तसेच जखमी झालेल्यांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.