नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊन काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे. या काळात तब्बल 343 पोलिसांनी आपले प्राण गमावले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकात पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.
मला पोलिसांच्या कुटुंबियांना सांगायचे आहे की, हे फक्त वीट आणि दगडाने बनविलेले स्मारक नाही. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने देशाला विकासाच्या मार्गावर नेले आहे. जर देश शांतपणे झोपला असेल. तर त्यांनी कर्तव्य पार पाडल्यामुळे. तसेच बदलत्या काळात पोलिसांसमोरील आव्हानेही बदलत असून उच्च तंत्रज्ञानयुक्त पोलीस दल उभारण्यासाठी गृह मंत्रालय काम करत आहेत. येत्या काळात पोलीस दलामध्ये अनेक सुधारणा पाहयला मिळतील, असे शाह म्हणाले.