नवी दिल्ली - रोजंदारीवर आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ४३ हजार मजुरांनी २०१९ या वर्षात आत्महत्या करुन जीवन संपविल्याची माहिती 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या अहवालात समोर आली आहे. २०१९ या वर्षातील एकूण आत्महत्येपैकी रोजंदारीवर काम करणाऱ्या ३२ हजार ५६३ मजूरांनी आत्महत्या केली. एकूण आत्महत्यांचा विचार करता ही टक्केवारी २३.४ टक्के आहे. २०१८ साली ही आकडेवारी ३० हजार १३२ होती. २०१९ या वर्षात देशभरात १ लाख ३९ हजार १२३ नागरिकांनी आत्महत्या केल्या आहेत.
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या १० हजार २८१ कामगारांनी २०१९ सालात आत्महत्या केली. (५ हजार ९५७ शेतकरी आणि ४ हजार ३२४ शेतमजूर). एकूण आत्महत्येपैकी कृषी क्षेत्रातील टक्केवारी ७.४ आहे. २०१९ साली शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी ५ हजार ५६३ पुरुष आणि ३९४ महिला आहेत. शेतमजूरांपैकी ३ हजार ७४९ तर ५७५ महिलांनी आत्महत्या केली.
महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या