महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आग्रा : एका दिवसात 32 नवीन कोरोना रुग्ण, एकूण आकडा 628 वर - आग्रा शहर कोरोना न्युज

ताजनगरी अशी ओळख असलेले आग्रा शहर येथे कोरोनाचा स्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारी या शहरात तब्बल 32 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत

32 new corona positive found in agra, number rises to 628
आग्र्यात एका दिवसात 32 नवीन कोरोना रुग्ण

By

Published : May 5, 2020, 10:19 AM IST

आग्रा (उत्तर प्रदेश) :जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. सोमवारी सकाळी 16 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 596 वरून 612 पर्यंत पोहचला होता. तोच सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत आणखी 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा आकडा 628 वर पोहचला. तसेच 15 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

आग्र्यात एका दिवसात 32 नवीन कोरोना रुग्ण

हेही वाचा...सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही तर... आरोग्य मंत्रालयाचा इशारा

ताजनगर म्हणजेच आग्रा शहरात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाहीये. सोमवारी रात्रीपर्यंत तब्बल 32 नवीन कोरोनाबाधित रुग्ण या परिसरात आढळले होते. केंद्र सरकाने या अगोदर आग्रा शहर हे रेड झोनमध्ये समाविष्ट केले आहे. मात्र, दिवसेगणिक आग्रा आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याचे दिसत आहे.

जिल्हाधिकारी नारायण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या जिल्ह्यात 628 कोरोनाबाधित आहेत. तसेच जिल्ह्यात 41 ठिकाणे कोरोनाचे हॉट स्पॉट आहेत. हे सर्व भाग सील करण्यात आले आहेत.राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांसह इतर जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details