महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जयपूर विमानतळावर 32 किलो सोने जप्त; वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून आले आरोपी

आरोपी स्पाईसजेटच्या विमानातून दुबईहून जयपुरला सोने घेऊन येत होते. जयपूर विमानतळावर आल्यानंतर सर्व प्रवाशांची तपासणी केली जात होती. यावेळी या आरोपींकडे संशयास्पद वस्तू आढळल्या. अधिक तपास केला असता यांच्याडून कोट्यावधीचे सोने जप्त करण्यात आले. या कारवाईत तीन वेगवेगळ्या फ्लाईट्समधून एकूण 14 तस्करांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Jaipur International Airport
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

By

Published : Jul 4, 2020, 9:41 AM IST

जयपूर -लॉकडाऊननंतर विमानसेवा सुरु होताच सोने तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत. केंद्र सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत विदेशात राहणाऱ्या भारतीयांना देशात आणले जात आहे. याच दरम्यान दुबईहून जयपूरला येणाऱ्या प्रवाशांकडून कस्टम विभागाने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर 32 किलो सोने जप्त करत मोठी कारवाई केली आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

आरोपी स्पाईसजेटच्या विमानातून दुबईहून जयपुरला सोने घेऊन येत होते. जयपूर विमानतळावर आल्यानंतर सर्व प्रवाशांची तपासणी केली जात होती. यावेळी या आरोपींकडे संशयास्पद वस्तू आढळल्या. अधिक तपास केला असता यांच्याडून कोट्यावधीचे सोने जप्त करण्यात आले. या कारवाईत तीन वेगवेगळ्या फ्लाईट्समधून एकूण 14 तस्करांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी हे 32 किलो सोने आपत्कालीन लाईटांच्या बॅटरीत भरून ठेवले होते. या सोन्याची किंमत अंदाजे 16 कोटी रुपये व्यक्त करण्यात येत आहे. तर जवळपास 4 महिन्यांनी जयपूर विमानतळावर शुक्रवारी सोनेतस्करीची मोठी घटना घडली आहे.

जयपूर विमानतळावर 32 किलो सोने जप्त; वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून आले आरोपी

दरम्यान, यातीलच शुक्रवारी रात्री एका स्पाईसजेट विमानातून 5 प्रवाशांना कोट्यावधीच्या सोन्यासह पकडण्यात आले आहे. हे प्रवासी स्पाईसजेट विमान SG 9055 यातून जयपूरला आले होते. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 4.70 कोटी रुपये सांगितली आहे. यानंतर सर्व तस्कारांना ताब्यात घेतले आहे. कस्टम विभागाचे पथक या आरोपींची चौकशी करत आहे. तसेच अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे सोने कोणाचे आहे? कोणी मागविले? आणि कुठे पोहोचवण्यात येणार होते? यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे? यासंबंधित पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details