महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये कोरोनाचे ३१ नवे रुग्ण आढळलेत; कोरोनाबाधितांचा आकडा २ हाजर ८०३ वर - corona update jaipur

राज्यात आतापर्यंत १ लाख १४ हजार ४११ नागरिकांच्या कोरोना नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ५ हजार १८२ नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आला असून ६ हजार ४५७ लोकांचा अहवाल अजून यायचा आहे.

31 new corona cases rajasthan
प्रतिकात्मक

By

Published : May 3, 2020, 11:46 AM IST

जयपूर- राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. आज सकाळी ९ वाजेपर्यंत कोरोनाची ३१ नवी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यानंतर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ८०३ वर पोहोचला आहे. त्याचबरोर, आज कोरोनामुळे २ लोकांचा मृत्यू झाला असून मृतकांचा आकडा ७० एवढा झाला आहे.

आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार आज प्रतापगढ मध्ये २, उदयपूरमध्ये ५, जयपूरमध्ये ८, जोधपूरमध्ये ९, अजमेरमध्ये २, चितौडगढमध्ये ३, कोटामध्ये १, डुंगरपूरमध्ये १ कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहेत. त्याचबरोबर, जयपूरमध्ये २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इरानमधून आलेले ३१ भारातीय, इटलीतून आलेले २ आणि इतर राज्यातून आलेले २ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

राज्यात आतापर्यंत १ लाख १४ हजार ४११ नागरिकांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ५ हजार १८२ नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आला असून ६ हजार ४५७ लोकांचा अहवाल अजून यायचा आहे. तसेच, १ हजार २४२ कोरोनाबाधितांची परत चाचणी करण्यात आली होती, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ज्यानंतर ८२५ नागरिकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा निहाय कोरोनाबाधितांचे आकडे

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रिचूर पोरम दिनी भगवान वडक्कमनाथन यांची भू्मी शांत

ABOUT THE AUTHOR

...view details