महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बालाकोटच्या 'जैश'च्या तळावर ३०० मोबाईल फोन अॅक्टिव्ह; एनटीआरओची माहिती - ३०० मोबाईल फोन अॅक्टिव्ह

भारतीय वायुसेनेने २६ फेब्रुवारीला पाकस्थित 'जैश'च्या तळांवर हवाई हल्ला केला होता.

AIRSTRIKE

By

Published : Mar 5, 2019, 10:25 AM IST

नवी दिल्ली- भारतीय वायुसेनेने २६ फेब्रुवारीला केलेल्या हल्ल्याबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या कॅम्पमधील ३०० मोबाईल फोन अॅक्टिव्ह होते, अशी माहिती नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनने (एनटीआरओ) दिली आहे. भारतीय वायुसेनेच्या कारवाईदरम्यान त्याठिकाणी ३०० दहशतवादी होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

भारतीय वायुसेनेने २६ फेब्रुवारीला पाकस्थित 'जैश'च्या तळांवर हवाई हल्ला केला होता. पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यु्त्तर म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आला. पुलवामा येथील हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आले होते.

भारताकडून केवळ दहशतवादी अड्ड्यांवर मारा करण्यात आला. या कारवाईत कोणी दहशतवादी मारला गेला नाही, असा प्रश्न अनेक विरोधी पक्षांनी उपस्थित केला होता. यानंतर आज नव्याने एनटीआरओकडून ही माहिती समोर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details