श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार होणारे दहशतवादी हल्ले निष्फळ करण्यासाठी सुरक्षा दले शोध अभियान राबवत आहेत. आज जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी तीन दहशतवाद्यांसाठी 30 लाख रुपये इनाम जाहीर केले आहे. हे तिघे हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेतील आहेत.
पोलिसांकडून दहशतवाद्यांचे पोस्टर जारी, सूचना देणाऱ्यांना ३० लाख रुपये इनाम
मोहम्मद अमिन (15 लाख रुपये) रियाज अहमद (7.5 लाख रुपये), मुदास्सिर हुसैन (7.5 लाख रुपये) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. याआधीही डोंडा येथील पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत अथवी मृत पकडून देणाऱ्यास १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
मोहम्मद अमिन(15 लाख रुपये) रियाज अहमद(7.5 लाख रुपये), मुदास्सिर हुसैन (7.5 लाख रुपये) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. याआधीही डोंडा येथील पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत अथवी मृत पकडून देणाऱ्यास १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 हटवण्यात आल्यापासून येथे दहशतवाद्यांकडून वारंवार हल्ले घडवून आणण्याची कारस्थाने केली जात आहेत. या हल्ल्यांना रोखण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांसह सर्व सुरक्षा दलांतर्फे संयुक्तपणे मोहिमा राबवल्या जात आहेत.
TAGGED:
आर्टिकल 370 न्यूज अपडेट