महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 9, 2020, 9:39 AM IST

ETV Bharat / bharat

त्रिपुरामध्ये बीएसफच्या आणखी 24 जवानांना कोरोनाची लागण

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी 30 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 116 वर पोहचला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी दिली.

30 fresh cases among BSF troopers, kin in Tripura
30 fresh cases among BSF troopers, kin in Tripura

आगरतळा -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी 30 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 116 वर पोहचला आहे, याची माहिती त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी दिली.

बटालियन 138 आणि बटालियन 86 मधील जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. नवीन कोरोनाबाधितांमध्ये 138 बटालियमधील जवानांच्या कुटुंबीयातील 4 सदस्य आणि एका ट्रक चालकाचाही समावेश आहे. सर्व कोरोनाबाधितांवर शहरातील गोविंद बल्लभ पंत वैद्यकीय कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बटालियन 138 आणि बटालियन 86 मधील तब्बल 680 जवानांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही चाचणी घेण्यात येत आहे. बटालियन मुख्यालय, गंडाचेरा येथील एक बेस कॅम्प आणि करीना येथे बांगलादेशला लागून असलेली सीमा चौकी अशी तीन ठिकाणे कन्टेंन्मेट झोन म्हणून घोषीत केली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details