हैदराबाद - एक तीन वर्षाचा मुलगा बोअरवेलच्या खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगाणाच्या मेडकमधील पोडचानपल्ली गावामध्ये ही घटना घडली. साई वर्धन असे या मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे, बोअर खणल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच हा प्रकार झाला.
तीन वर्षाचा मुलगा पडला बोअरवेलमध्ये; तेलंगाणाच्या मेडकमधील घटना.. - Telangana bore well accident
शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोअर खणण्याचे काम सुरू होते. या मुलाचे आईवडीलही याच कामात व्यग्र असताना ही दुर्घटना घडली. याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत पाठवली आहे. पप्पान्नापेटा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत..
तीन वर्षाचा मुलगा पडला बोअरवेलमध्ये; तेलंगाणाच्या मेडकमधील घटना..
शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोअर खणण्याचे काम सुरू होते. या मुलाचे आईवडीलही याच कामात व्यग्र असताना ही दुर्घटना घडली. याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत पाठवली आहे. पप्पान्नापेटा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. बोअर खणल्यानंतर तेथील खड्डा झाकून न ठेवल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समजत आहे.