नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. लाखो लोकांना कोरोनाची बाधा झाली असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील विविध ५३ देशांमध्ये आत्तापर्यंत ३ हजार ३३६ भारतीय नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यातील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातून आत्तापर्यंत ३८ देशांच्या ३५ हजार नागरिकांना सुरक्षित त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे.
जगभरातील ५३ देशांमध्ये ३ हजार ३३६ भारतीय नागरिकांना कोरोनाची बाधा; २५ जणांचा मृत्यू - हायड्रॉक्सिक्लोरोक्विन
जगभरातील विविध ५३ देशांमध्ये आत्तापर्यंत ३ हजार ३३६ भारतीय नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यातील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातून आत्तापर्यंत ३८ देशांच्या ३५ हजार नागरिकांना सुरक्षित त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे.
कोरोनाचे उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन लसीसाठी आत्तापर्यंत ५५ देशांनी मान्यता दिली आहे. यातील अनेक देशांनी भारताकडे हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची मागणी केली आहे. २१ देशांनी व्यापारी तरतूदींमधून तर ४ देशांनी अनुदान म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन मिळवले आहे. या दरम्यान भारताने अनेक देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा पुरवठा करुन मदत केली आहे.
भारतात मागील ७९ दिवसांमध्ये १२ हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. ३० जानेवारीला केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढत गेली. 28 मार्चपर्यंत ही संख्या १ हजार १३ होती. पुढच्या चार दिवसातच हा आकडा २ हजार ६ झाला. सध्या देशात १० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.