महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीर खोऱ्यात चकमक... सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Jaish-e-Mohammed

काश्मीर खोऱ्यातील त्रालमध्ये आज सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे.

काश्मीर खोऱयात 3 दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीर खोऱयात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

By

Published : Jan 12, 2020, 5:44 PM IST

श्रीनगर -काश्मीर खोऱ्यातील त्रालमध्ये आज सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे. यामध्ये हिजबूल मुजाहीदीन संघटनेचे 2 तर जैश ए मोहम्मद संघटनेचा एक अशा तीन दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले.

त्रालच्या गुलशनपूरभागामध्ये पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनचे दहशतवादी उमर फयाज लोन, अदील बशीर मीर तर जैश ए मोहम्मदचा दहशतवादी फैजन हमीद भट ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.पुलवामामध्ये 3 दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. सकाळी भारतीय जवानांकडून शोधमोहिम सुरू असतानाच सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीला सुरूवात झाली. यावेळी सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर देत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details