नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. जवानांच्या मृत्यूनंतर बीएसएफ मुख्यालयाने दु:ख व्यक्त केले आहे. कोरोना संकटाच्या काळात बीएसएफचे जवान स्थानिक पोलिसांबरोबर काम करत आहेत. त्यामुळे अनेकांना संसर्ग होत आहे.
बीएसएफच्या दोन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू; मागील २४ तासांत ४१ जवान बाधित
आत्तापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलातील ३ जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालपासून( बुधवार) बीएसएफच्या आणखी ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आत्तापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलातील ३ जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालपासून( बुधवार) बीएसएफच्या आणखी ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील अनेक जण स्थानिक पोलिसांबरोबर काम करत असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, असे बीएसएफने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ज्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांची विलगीकरण करण्यात येत आहे. या सर्वांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येणार असल्याचे बीएसएफ कार्यालयाने सांगितले.
३ मे ला एका बीएसएफच्या जवानाला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती जास्त खराब झाल्याने त्याला आयसीयूत दाखल करण्यात आले. मात्र, ४ मे ला त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोनाची चाचणी घेतली असता अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ६ मे ला सायंकाळी अहवाल आल्याचे बीएसएफने स्पष्ट केले आहे. तीन जवानांच्या मृत्यूनंतर बीएसएफने दु:ख व्यक्त केले आहे.