कुल्लू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिमाचल प्रदेश दौर्याच्या तीन दिवस आधी कुल्लू जिल्ह्यातील मनाली येथे एका व्यक्तीकडून विनापरवाना रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 3 ऑक्टोबर रोजी कुटलू जिल्ह्यातील मनाली आणि लाहौल-स्पीती जिल्ह्यातील लाहौल व्हॅली येथे पंतप्रधान रोहतांगच्या अटल बोगद्याच्या उद्घाटनासाठी येत आहेत.
पोलिसांनी प्रिणी येथील नामांकित उद्योगपतीच्या कारमधील तीन रिव्हॉल्व्हर्स जप्त केली. यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी चार जणांना अटक केली आहे. यापैकी दोन रिव्हॉल्व्हरचा परवाना आहे. तर, एक बेकायदेशीर आहे. हे रिव्हॉल्व्हर्स राज्यस्तरीय परवाने असलेले आणि हरियाणामध्ये बनविलेले आहेत. प्रिणीमधील वाहनांच्या तपासणीदरम्यान पोलीस आणि सुरक्षा संस्थांना ही माहिती मिळाली. एका वाहनात तीन शस्त्रे सापडल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
हेही वाचा -रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिक करणार 3,675 कोटी रुपयांची गुंतवणूक