महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंड : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ३ पोलिसांना वीरमरण; १ गंभीर - 1 police personnel critically injured in naxal attack

विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधीच झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात नक्सलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ३ पोलिसांना प्राण गमवावे लागले. तर, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.

३ पोलिसांना वीरमरण

By

Published : Nov 22, 2019, 10:33 PM IST

Updated : Nov 22, 2019, 10:44 PM IST

लातेहार -विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधीच झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ३ पोलिसांना प्राण गमवावे लागले. तर, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील चंदवा पोलीस ठाणे क्षेत्रातील लुकोरिया वळणाजवळ पोलिसांच्या पथकावर हल्ला केला.

हे पोलीस दीर्घ श्रेणी योजनेनुसार (एलआरपी) निघाले होते. यादरम्यान ते लुकोरिया वळणाजवळ येऊन पोहोचले. येथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

घटनेची सूचना मिळताच चंदवा पोलीस ठाण्यातील अतिरिक्त पोलीस घटनास्थळी रवाना झाले. लोहदरगा येथूनही पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे येथे भीतीचे वातावरण आहे.

Last Updated : Nov 22, 2019, 10:44 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details