श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या मेंढार सेक्टरमध्ये ९ फेब्रुवारीला पाकिस्तानने गोळीबार केला होता. याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमाभागात मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्याला भारतीय लष्करही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. अशाच एका हल्ल्यात भारताने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.