महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयआयटी दिल्लीमध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्यांनी केली सामूहिक आत्महत्या - सफदरजंग

भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसमध्ये सासू-सून आणि मुलाने गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याची  खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

दिल्लीमध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्यांनी केली सामूहिक आत्महत्या

By

Published : Jul 27, 2019, 1:59 PM IST

नवी दिल्ली -संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या बुराडी येथील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आत्महत्येनंतर असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसमध्ये सासू-सून आणि मुलाने गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

IIT दिल्लीमध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्यांनी केली सामूहिक आत्महत्या


शुक्रवारी संध्याकाळी कॅम्पसमध्ये तीघांचा मृत्यू एकाच वेळी झाल्याची माहिती आहे. तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी कीशनगढ ठाण्यातील पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. दरम्यान तिघांचे मृतदेह सफदरजंग येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्ये मागचं कारण अजून समोर आलेलं नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details