महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुकमामध्ये 3 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; दोघांवर १ लाखांचे बक्षीस - 3 naxalite surrender in sukma latest news

तिन्ही नक्षलवादी बऱ्याच नक्षलवादी हल्लांमध्ये सहभागी होते. आदिवासींवर होणाऱ्या वाढत्या अत्यांचारामुळे हे नक्षली व्यथित झाले. त्यामुळेच त्यांनी मुख्य प्रवाहात परत येण्याचा निर्णय घेतला, असा दावाही त्यांनी केला. तर या नक्षलदाद्यांना प्रोत्साहन बक्षीसासह सरकारच्या पुनर्वसन योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

3 naxalite surrender in sukma; 2 lakhs prize on both of them
सुकमामध्ये 3 नक्षलवाद्यांचे समर्पण; त्यांतील दोघांवर १ लाखांचे बक्षीस

By

Published : Dec 14, 2019, 12:42 PM IST

सुकमा -गुरुवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी आणि सीआरपीएफ सेंकड बटालियनचे कमांडंट ताशी ग्यालिक यांच्या उपस्थितीत 3 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गोंचे धुरवा, मंगलराम, सोडी गंगा आणि माचकोट एलजीएस सदस्य मंगल राम असे या नक्षलवाद्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे यातील 2 नक्षलवाद्यांवर १-१ लाखांचे बक्षीस होते.

सुकमामध्ये 3 नक्षलवाद्यांचे समर्पण

यावेळी एएसपी तिवारी यांनी सांगितले, हे तिन्ही नक्षलवादी बऱ्याच नक्षलवादी हल्लांमध्ये सहभागी होते. आदिवासींवर होणाऱ्या वाढत्या अत्यांचारामुळे हे नक्षली व्यथित झाले. त्यामुळेच त्यांनी मुख्य प्रवाहात परत येण्याचा निर्णय घेतला, असा दावाही त्यांनी केला. तर या नक्षलदाद्यांना प्रोत्साहन बक्षीसासह सरकारच्या पुनर्वसन योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कोण आहेत हे तीन नक्षली?

हेही वाचा -अशांत ईशान्य : 'कॅब' विरोधी आंदोलन चिघळलं, पोलीस गोळीबारात चार जणांचा मृत्यू!

मंगल राम (रा. दरभा) हा 2016 मध्ये नक्षलवादी संघटनेशी जुळला. यानंतर त्याने 2017 मध्ये कुम्माकोलेंग गावाचे सरपंच पांडूराम नाग यांची हत्या केली. तसेच 2018 मध्ये दलदली येथे झालेल्या एन्काऊंटर आणि लुलेर गावाजवळ रस्ते निर्माण कार्यात असलेल्या मशिन आणि वाहने जाळण्याच्या कार्यातही त्याचा सहभाग होता.

गंगा 2011 मध्ये नक्षली आश्रम शिक्षक म्हणून या नक्षली चळवळीसोबत जुळला. 2012 मध्ये पालोडी तलावाजवळ झालेल्या एन्काऊंटर मध्ये सहभागी होता. यामध्ये 8 जवान शहीद झाले होते. यानंतर 2014 मध्ये वेलक नगुडा जवळ झालेल्या नक्षली फायरिंग, 2015 मध्ये करीगुंडम येथील सोडी सोमा आणि निर्मलगुडाच्या ग्रामीण राममूर्तीच्या हत्येमध्ये गंगाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

गोंचे धुरवा याला कमांडर माड़वी भीमेने 2012 मध्ये नक्षली संगठन सोबत जोडले. धुरवाने गेल्या वर्षी बीजापुरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रवासादरम्यान जिल्ह्यातील बोरगुडामध्ये सुरक्षारक्षकांचे कँपमध्ये आईडीचा स्फोट घडवला. तसेच सोडी पोरामध्ये सरपंच कलमू धुरवाच्या हत्येतही तो सहभागी होता.

ABOUT THE AUTHOR

...view details