बंदा -उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात यमुना नदीत नौका उलटल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बंदा सीमेवरुन शनिवारी सायंकाळी साडेसहा दरम्यान परत येत असताना ही दुर्घटना घडली. पोलीस उपनिरिक्षक रामजीत सोनकर (५२ वर्षे) तर पोलीस जवान शशिकांत (२५ वर्षे) यांच्यासह नौकावाहक रवी वय २७ याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यमुना नदीत नौका उलटल्याने ३ जणांचा मृत्यू - बंदा न्यूज
बंदा सीमेवरुन शनिवारी सायंकाळी साडेसहा दरम्यान परत येत असताना ही दुर्घटना घडली. पोलीस उपनिरिक्षक रामजीत सोनकर (५२ वर्षे) तर पोलीस जवान शशिकांत (२५ वर्षे) यांच्यासह नौकावाहक रवी वय २७ याचा या दुर्घटने मृत्यू झाला आहे.

यमुना नदीत नौका उलटल्याने ३ जणांचा मृत्यू
या तिघांसोबत पोलीस जवान निर्मल यादव हे देखील होते. मात्र, नौका उलटल्यानंतर त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी आपला जीव वाचवला. पाण्यात असलेल्या खडकाला धडक बसल्यामुळे ही नौका बुडाल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी १२ तास शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडले आहेत.