महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरच्या तरुणांवरील दहशतवादी समुपदेशनाचा डाव उधळलला

दहशतवाद्यांच्या गटात सामील न होण्याबाबत त्यांची समजूत काढून तिन्ही तरुणांना त्राल पोलीस ठाण्यात नेले आणि नंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर काश्मिरी तरुणांना दहशतवाद्यांच्या गटात सामील होण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मंदुरा गावचे रिझवान अहमद वानी आणि रईस अहमद चोपान यांना अटक करण्यात आली आहे.

दहशतवादी
दहशतवादी

By

Published : Jun 6, 2020, 7:43 PM IST

श्रीनगर -जम्मू-काश्मीरमधील तीन तरुणांना समुपदेशन करून दहशतवाद्यांच्या गटात सामील करण्याचा डाव सुरक्षा दलाने हाणून पाडला. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल आणि किशोर येथील मुलांवर समुपदेशन करण्यात येत होते. त्यांच्यावर समुपदेशन करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरील दोन्ही ठिकाणचे काही तरुण दहशतवादी संघटनेत सामील होण्याच्या मार्गावर असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या तिघांनी त्यांच्या भागात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांशी संपर्क साधला होता, ज्यांना अलिकडेच अटक करण्यात आली आहे, असे पोलीस म्हणाले. सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई करत इलियास अमीन वानी (वय 21), अबरार अहमद रेशी (वय 17, दोघेही त्रालमधील मंदुरा गावचे रहिवासी) आणि उंबैद अहमद शाह (वय 19 रा. शालड्रामन) यांना ताब्यात घेतले.

दहशतवाद्यांच्या गटात सामील न होण्याबाबत त्यांची समजूत काढून तिन्ही तरुणांना त्राल पोलीस ठाण्यात नेले आणि नंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर काश्मिरी तरुणांना दहशतवाद्यांच्या गटात सामील होण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मंदुरा गावचे रिझवान अहमद वानी आणि रईस अहमद चोपान यांना अटक करण्यात आली आहे.

त्राल परिसरातील पन्नर, मंदूर, चंकितरार, रत्सुना येथून लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना रसद, निवारा देणे आणि अन्य मदत पुरवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details