लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये झालेल्या एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जखमी झाले. कन्नौजच्या जालापूर भागामध्ये बस आणि व्हॅनची टक्कर होऊन हा अपघात घडला. यामध्ये अजित कुमार (३०), शकुंतला (३५) आणि सात वर्षांच्या आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व कानपूरचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅनला धडकल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खंदकात कोसळली. या बसमध्ये असलेले १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर व्हॅनमधील पाच व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कन्नौज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली. गंभीर जखमींपैकी काहींना कानपूरच्या लाला लजपतराय रुग्णालयात नेण्यात आले. तसेच त्यांपैकी तिघांना तिरवामधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले.