नवी दिल्ली - गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे घराचे छप्पर कोसळल्याने उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज भागात दोन वर्षांच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेत 4 जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी वाराणसी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पावसामुळे घराचे छप्पर कोसळून 3 जण ठार तर 4 जखमी, मृतांमध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश - heavy rains Mirzapur
घराचे छप्पर कोसळल्याने उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज भागात दोन वर्षांच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
बिलकिस आणि मुन्नी या दोघींचा जागीच मृत्यू झाला तर 2 वर्षीय मुलगी वानियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरौधा गावात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी बरौधा गावात धाव घेतली. दोन्ही मृत महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
दरम्यान हिना, पलक, फरीन आणि जैद हे छत कोसळल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमीक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, परिस्थिती आणखी गंभीर झाल्यानंतर त्यांना वाराणसी ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.