नवी दिल्ली - तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबादमध्ये कोरोना विषाणूचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. विशेष रुग्णवाहिकेतून त्यांना शहरातील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात येत आहे. काल हैदराबादमध्ये दुबईवरून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
हैदराबादमध्ये तीन कोरोना विषाणू संशयित; विशेष रुग्णालयाची स्थापना - हैदराबाद कोरोना कोवीड १९
काल हैदराबादमध्ये दुबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी विशेष रुग्णालयाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यंमत्री के. सी. आर. राव यांच्या निर्देशांनुसार निर्णय घेण्यात येत आहेत. सरकारचे नऊ विभाग एकत्र येऊन कोरोनाचा सामना करणार आहेत.
श्वसनाच्या आजारासंबधी डॉक्टर आणि नर्सेसची गरजेनुसार नेमणूक करण्यात येईल. खासगी रुग्णालयांनाही कोरानाच्या धोक्याची सूचना देण्यात आली आहे. जर एखादा संशयित रुग्ण आढळून आल्यास सरकारी रुग्णालयात आणण्याबाबत खासगी रुग्णालयांना सांगण्यात आले आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री एतला राजेंद्र यांनी सांगितले.