नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन दोषींनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात फाशी थांबवण्याची मागणी केली आहे. दोषी अक्षय, पवन आणि विनयने ही याचिका दाखल केली आहे.
निर्भया प्रकरण : दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव.. फाशीला स्थगितीची मागणी - convict in the 2012 Nirbhaya gang-rape
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन दोषींनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात फाशी थांबवण्याची मागणी केली आहे.
![निर्भया प्रकरण : दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव.. फाशीला स्थगितीची मागणी 3-CONVICTS-OF-NIRBHAYA-CASE-APPROACHED-INTERNATIONAL-COURT-OF-JUSTICE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6429292-596-6429292-1584357479426.jpg)
दरम्यान आजच दोषी मुकेश कुमार याने फाशी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. या याचिकेत मुकेश याने स्वतःच्याच जुन्या वकिलांवर आपली दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निर्भयाचे दोषी फाशी टाळण्यासाठी कायदेशीर प्रकियेचा चुकीचा वापर करत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. वेळोवेळी याचिका दाखल केल्यामुळे दोषींची फाशी या आधी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, निर्भया प्रकरणी डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि मुकेश कुमार या चौघांना २० मार्चला पहाटे ५.३० वाजता फाशी होणार आहे