चंदेल- म्यानमारच्या सीमेजवळील मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात स्थानिक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या 3 जवानांना वीरमरण आले आहे, तर 4 जवान गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; लष्कराच्या 3 जवानांना वीरमरण, 4 जखमी - मणिपूर दहशतवादी हल्ला
म्यानमारच्या सीमेजवळील मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात स्थानिक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या 3 जवानांना वीरमरण आले आहे, तर 4 जवान गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे 3 जवान शहीद
भारत-म्यानमार सीमेजवळ ही घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी प्रथम आयईडीचा स्फोट घडवून आणला आणि नंतर सैन्यावर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर इम्फाळपासून 100 किमी अंतरावर असलेल्या भागात सैन्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Last Updated : Jul 30, 2020, 12:52 PM IST