महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये आजपासून २ जी इंटरनेट सेवा सुरू - जम्मू काश्मीर बंद बातमी

२५ जानेवरी म्हणजेच शनिवारपासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात येईल, अशी नोटीस जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने जारी केली आहे.

mbile file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 25, 2020, 9:35 AM IST

श्रीनगर- तब्बल पाच महिन्यांहून जास्त काळ बंद असलेली इंटरनेट सेवा जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पोस्टपेड सह प्रीपेड सीमकार्डवरील २ जी इंटरनेट सेवा खोऱ्यातील सर्व जिल्ह्यात सुरळीत करण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियावरील बंदी तशीच ठेवण्यात आली असून फक्त ३०१ परवानगी देण्यात आलेल्या वेबसाईटच नागरिकांना वापरता येणार आहेत.

हेही वाचा -चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घूणपणे खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

२५ जानेवरी म्हणजेच शनिवारपासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात येईल, अशी नोटीस जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने जारी केली आहे. 'व्हाईट लिस्टेड वेबसाईट' म्हणजे प्रशासनाने परवानगी देण्यात आलेली संकेतस्थळेच नागरिकांना वापरण्यात येणार आहेत, तर सोशल मिडिया बंद साईटस् बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -नो टू सिंगल यूज प्लास्टिक : कर्नाटकच्या नितीन यांची प्लास्टिकविरोधात लढाई..


बँकिंग, शिक्षण, वृत्तपत्रे, प्रवास, नोकरी, पर्यटन अशा क्षेत्रासंबधीत संकेतस्थळे नागरिकांना वापरता येणार आहेत. मागील पाच महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. याआधी पोस्टपेड सीमकार्डवर ठरावीक संकेतस्थळांना परवानगी देण्यात आली होती, आता ही सेवा प्रिपेड सीमलाही देण्यात आली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे खोऱ्यातील नागरिकांचा इतर जगाशी संपर्क तुटला होता. इंटरनेट सुरू झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details