महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुखद! कर्नाटकातील 297 पत्रकारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह - कोरोना चाचणी निगेटिव्ह

कर्नाटकातील 300 पत्रकारांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात 297 पत्रकारांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने रविवारी ही माहिती दिली.

297 Bengaluru journos test negative for COVID-19
297 Bengaluru journos test negative for COVID-19

By

Published : Apr 27, 2020, 8:27 AM IST

बंगळुरु -भारतामध्येही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. यामध्ये पत्रकारांनाही कोरोनाची बाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. खबरदारी बाळगत कर्नाटकातील 300 पत्रकारांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात 297 पत्रकारांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने रविवारी ही माहिती दिली.

शुक्रवारी चाचण्या घेतलेल्या तब्बल 297 पत्रकारांच्या चाचणीचे निकाल नकारात्मक असल्याचे समोर आले, असे सहसंचालक डी. पी. मुरलीधर यांनी एका निवेदनात म्हटले आहे. चार स्लॉटमध्ये चाचण्या नियोजित करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी गुरुवारी 120 पत्रकाराची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी एका खाजगी वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱया कॅमेरामन असलेल्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटव्ह आली होती. दरम्यान आणखी 345 पत्रकारांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. त्याचा निकाल सोमवारी कळेल. आतापर्यंत 762 पत्रकारांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details