नवी दिल्ली -चीनमध्ये भयानक रूप धारण केलेल्या कोरोना विषाणूने भारतातही आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढून 29 झाली आहे. यातील 16 परदेशात जाऊन आलेले आहेत. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 29 वर, 28 हजार 529 संशयीत देखरेखीखाली - Union Health Minister
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आज (गुरुवार) लोकसभेत कोरोनाच्या भारतातील स्थितीबाबत माहिती सांगितली. 4 मार्चपर्यंत देशात 28 हजार 529 संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना विषाणू
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आज (गुरुवार) लोकसभेत कोरोनाच्या भारतातील स्थितीबाबत माहिती सांगितली. 4 मार्च पर्यंत देशात 28 हजार 529 संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी देशात 28 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत.
राज्यांतील परिस्थिती -
- महाराष्ट्रात 161 पर्यटकांची तपासणी निगेटिव्ह आली असून नऊ लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्तापर्यंत 66 हजार 966 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.
- उत्तर प्रदेशातील आग्र्यात 27 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीअंती निगेटिव्ह आले आहेत.
- राजस्थानमधील फोर्टीस रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे नमुने निर्दोश आले आहेत. याच ठिकाणी इटलीतून आलेल्या नागरिकांना तपासणीसाठी नेण्यात आले होते.
- कर्नाटकात कोरोनाचे तीन संशयित आढळले आहेत.
- दिल्ली आणि राजस्थानसहित अनेक राज्यांनी हॉटेल आणि गेस्ट हाऊसमधील पर्यटकांची तपासणी सुरू केली आहे.
- राजस्थानमधील पर्यटकांच्या संपर्कात आलेल्या एकूण 215 लोकांपैकी 93 लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
- दिल्लीमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 88 लोकांची तपासणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
- तेलंगाणामधून दोन संशयितांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
- केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्येही प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे.
- आंध्र प्रदेशात परदेशात जाऊन आलेल्या 8 लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
- पंजाबमध्ये आत्तापर्यंत 70 हजार लोकांची चाचणी करण्यात आल्याची माहिती पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह सिद्धू यांनी राज्यसभेत दिली.
Last Updated : Mar 5, 2020, 1:24 PM IST