महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना दहशत : २७७ भारतीय आज सकाळी मायदेशी परतले - #COVID19

इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आज सकाळी इराणमधील २७७ भारतीय मायदेशी परतले आहेत.

277 evacuees from Iran arrived at Jodhpur Airport today
277 evacuees from Iran arrived at Jodhpur Airport today277 evacuees from Iran arrived at Jodhpur Airport today

By

Published : Mar 25, 2020, 10:50 AM IST

तेहरान - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आज सकाळी इराणमधील तब्बल २७७ भारतीय मायदेशी परतले आहेत.

इराणच्या तेहरानमधून या नागरिकांना घेऊन निघालेले विमान आज पहाटे जोधपूर विमानतळावर उतरले आहे. यामध्ये महिला, मुले, युवक आणि वृद्धांचा समावेश आहे. या सर्वांची इराणमध्ये करण्यात आलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या सर्वांची भारतामध्ये उतरल्यानंतर विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. त्यांना जोधपूरमधील लष्करी तळावर नेण्यात आले. त्यांना याठिकाणी विशेष कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल.

इराणच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये एकूण सहा हजारांहून अधिक भारतीय अडकले होते. त्या सर्वांना टप्प्या-टप्प्याने ईराणमधून एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यापूर्वी एअरलिफ्ट करण्यात आलेल्यांना राजस्थानमधील जैसलमेर येथे उतरवण्यात आले होते. त्या सर्वांची जैसलमेरमधील लष्करी तळावर तपासणी करण्यात आली असून त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details