महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीच्या सीमेवर अकोल्यातील अडीचशे शेतकऱ्यांचे आंदोलन - पलवल येथे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राजधानीपासून काही अंतरावर असलेल्या हरयाणातील पलवल येथे मागील ३८ दिवसांपासून शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू असून यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला आहे.

दिल्लीच्या सीमेवर अकोल्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन
दिल्लीच्या सीमेवर अकोल्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन

By

Published : Jan 9, 2021, 11:29 AM IST

पलवल - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राजधानीपासून काही अंतरावर असलेल्या हरयाणातील पलवल येथे मागील ३८ दिवसांपासून शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन आहे. येथे महाराष्ट्रातील सुमारे अडीचशे शेतकरी आंदोलकांचा गट पोहचला आहे. यात सुमारे ५० महिलांचाही समावेश आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी या आंदोलकांनी केली. कडाक्याच्या थंडीतही त्यांनी दिल्लीची वाट धरली आहे.

दिल्लीच्या सीमेवर अकोल्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन

पलवल येथे उपोषण आणि धरणे आंदोलन

हरयाणातील पलवलमधून जाणाऱ्या महामार्ग -१९ वरील अटोहां चौकात शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन आणि उपोषण करण्यात येत आहे. येथे अकोल्यातील शेतकऱ्यांचा गट पोहचला आहे. कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. येथे मागील २० दिवसांपासून उपोषण आंदोलन करण्यात येत आहे.

काळे कायदे रद्द करा - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी -

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून दिल्लीत आल्याचे अकोल्यातील आंदोलक अविनाश देशमुख यांनी सांगितले. अकोला महाराष्टातून आम्ही सर्व शेतकरी आलो आहोत. २०० ते २५० शेतकऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने पास केलेल्या काळ्या कायद्यांना मागे घेण्यात यावे या शेतकऱयांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. हाच आमचा उद्देश असल्याचे देशमुख म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details