महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय अर्थसंकल्पातील २५ महत्त्वपूर्ण घोषणा - निर्मला सीतारामन

प्राप्तीकर रचनेत कसलाही बदल करण्यात न आल्याने करदात्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. गेल्या अर्थसंकल्पात दोन प्रकारातील प्राप्तीकर रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर करदात्यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. गेल्या वर्षीची कर रचना यावर्षीही तशीच राहणार आहे.

अर्थसंकल्पातील 25 महत्वाच्या घोषणा
अर्थसंकल्पातील 25 महत्वाच्या घोषणा

By

Published : Feb 1, 2021, 1:32 PM IST

Updated : Feb 2, 2021, 6:15 AM IST

  • प्राप्तीकर रचनेत कसलाही बदल नाही
  • 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना आयटी रिटर्न भरण्यापासून सुट
  • आरोग्य क्षेत्रासाठी 2.23 लाख कोटींची तरतूद
  • नव्या आरोग्य योजनेसाठी 64 हजार कोटींच्या तरतूदीची घोषणा
  • कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद
  • मिशन पोषण 2.0 चा शुभारंभ करणार
  • 16.5 लाख कोटी कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
  • लहान सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार कोटींची तरतूद
  • रस्ते मंत्रालयासाठी 1.18 लाख कोटींची तरतूद
  • मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद
  • रेल्वेसाठी 1.10 लाख कोटींची तरतूद
  • भूसावळ ते खरगपूर रेल्वे कॉरिडोरची घोषणा
  • नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटींची तरतूद
  • नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटींची तरतूद
  • जल जीवन मिशन-अर्बनचा शुभारंभ करणार
  • जल जीवन मिशनसाठी 2.87 हजार कोटी खर्च करणार
  • अर्बन स्वच्छ भारत मिशनसाठी 1.41 लाख कोटींची तरतूद
  • डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार कोटींची तरतूद
  • लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद
  • सरकारी बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद
  • डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन (DFI)ची स्थापना करण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद
  • १०० सैनिक स्कूल उभारणार, उच्च शिक्षणासाठी कमिशनची स्थापना होणार. त्यासाठी कायदा बनवणार
  • लडाखमध्ये उच्च शिक्षणासाठी लेह येथे केंद्रीय विद्यापीठ उभारणार
  • ७५८ एकलव्य स्कूल आदिवासी भागात उभारणार
  • मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्कची सुरूवात करणार, तीन वर्षांत सात टेक्स्टाईल पार्क उभारणार
  • सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमधील निर्गुंतवणुकीचे धोरण, निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी उभारणार
  • हायड्रोजन मिशनची स्थापना करण्यात येईल
  • उज्ज्वला योजनेमध्ये आणखी १ कोटी लाभार्थ्यांचा समावेश करणार
  • काश्मीरमध्ये गॅस पाईपलाईन प्रकल्पाची घोषणा
  • पर्यावरणाच्या दृष्टीने वाहनांच्या वापराच्या कालावधीवर मर्यादा
Last Updated : Feb 2, 2021, 6:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details