महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लडाखमध्ये बचावकार्य सुरु असताना पंजाबातील जवानाचा मृत्यू - पंजाबातील जवान शहीद

लान्स नायक सलीम खान असे मृत जवानाचे नाव असून तो पटियालातील मर्दानहेरी गावातील होता. लष्करातील 58 इंजिनिअरिंग रेजिंमेंटमध्ये तो कार्यरत होता.

लान्स नायक सलीम खान
लान्स नायक सलीम खान

By

Published : Jun 27, 2020, 6:34 PM IST

पटियाला -पंजाबमधील 24 वर्षीय जवानाचा लडाखमध्ये बचावकार्य सुरु असताना शोक नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रोप बांधत असताना बोट नदीत बुडाल्याने जवानाचा मृत्यू झाला. तो पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील असून त्याच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शोक व्यक्त केला आहे.

लान्स नायक सलीम खान असे या जवानाचे नाव असून तो पटियालातील मर्दानहेरी गावातील होता. लष्करातील 58 इंजिनिअरिंग रेजिंमेंटमध्ये तो कार्यरत होता. जवानाचा मृतदेह गावी आणण्यात येणार असून गावात अंत्यसंस्कार होणार आहेत. सलीम याचे वडील मंगल दीन हे सुद्धा लष्करात होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचाही मृत्यू झाला होता. ं

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जवानाला आदरांजली वाहीली. लान्स नायक सलीम खान याचा लडाखमध्ये मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. धाडसी जवानाला देशाचा सलाम. जय हिंद, असे ट्विट सिंग यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details