नवी दिल्ली - इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी ही माहिती दिली.
यांमध्ये १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविकांचा समावेश होता. 'इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय हे मायदेशी परतले आहेत. इराणमधील भारतीय राजदूत धामू गड्डाम यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे धन्यवाद. तसेच, इराणी अधिकाऱ्यांचेही धन्यवाद.' असे ट्विट करत जयशंकर यांनी ही माहिती दिली.
इराणमधून आणलेल्या भारतीयांची तिसरी बॅच रविवारी देशात दाखल झाली. याआधी शुक्रवारी ४४ भाविकांना मायदेशी आणण्यात आले होते. तसेच, मंगळवारी ५८ भारतीयांची पहिली बॅच भारतात दाखल झाली होती.
चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इराणला बसला आहे. त्यामुळे इराणने आपल्या सीमा बंद केल्या असून, देशात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तसेच, लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इराण लष्कराचीही मदत घेत आहे.
हेही वाचा :कोरोना विषाणू : गृह मंत्रालयाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत