कोलाकाता- पश्चिम बंगाल राज्याचे बुलबुल चक्रीवादळामुळे २३ कोटी ८११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने बुलबुल चक्रीवादळानंतर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी एका समिती स्थापन केली होती. शनिवारी समितीने केंद्र सरकारला नुकसानीबाबत अहवाल सादर केला. या अहवालातून आकडेवारी समोर आली आहे.
'बुलबुल'मुळे पश्चिम बंगाल सरकारला २३ हजार कोटींचा फटका
पश्चिम बंगाल राज्याने बुलबुल चक्रीवादळामुळे २३ कोटी ८११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारने बुलबुल चक्रीवादळानंतर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी एका समिती स्थापन केली होती. या अहवालात ही माहिती समोर आली.
पश्चिम बंगाल राज्याचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी शनिवारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर हा अहवाल केंद्र सरकारला देण्यात आला. यावेळी केंद्रिय पथकाने केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच पथकाने चक्रीवादळाने नुकसान ग्रस्त झालेल्या दक्षिण परगणा, मिदनापूर आणि आजूबाजूच्या परिसराला भेट देवून आढावा घेतला.
तीन जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळामुळे २३ कोटी ८११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ३५ लाख लोकांना वादळाचा प्रत्यक्षपणे फटका बसला आहे. तर वादळामुळे ५ लाख १७ हजार ५३५ घरांचे नुकसान झाले.
बुलबुल चक्रीवादळ
बुलबुल चक्रीवादळ ३० ऑक्टोबर रोजी बंगाल उपसागराच्या दक्षिण भागात तयार झाले होते. काही काळातच या चक्रीवादळाने रुद्र रुप धारण केले होते. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारी भागातील मालमत्तेचे नुकसान झाले. याबरोबरच व्हिएतनाम देशालाही या वादळाचा फटका बसला.