देडहाडून - लॉकडाऊनमुळे उत्तराखंड राज्यात अडकलेले २ हजार २५७ नागरिक आज (शुक्रवारी) स्वदेशी परतले आहेत. बसद्वारे या सर्व नागरिकांना माघारी पाठविण्यात आले आहे. राज्यातील झुलाघाट येथून १ हजार २९९ आणि धारचुला येथून ९५७ नेपाळी नागरिकांना माघारी पाठविण्यात आले आहे. स्वदेशी जायला मिळणार म्हणून नागरिकांनी खुश होत भारत-नेपाळ जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
उत्तराखंडमध्ये अडकून पडलेले 2 हजार २५७ नेपाळी मायदेशी परतले - भारत-नेपाल मैत्री जिंदाबाद
सध्या भारत आणि नेपाळ दोन्ही राज्यामध्ये लॉकडाऊन आहे. मात्र, स्थलांतरित मजुरांना घरी जाण्याची ओढ लागली आहे. मात्र, संचारबंदीमुळे दोन्ही राज्यांना जोडणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.
सध्या भारत आणि नेपाळ दोन्ही राज्यामध्ये लॉकडाऊन आहे. मात्र, स्थलांतरित मजुरांना घरी जाण्याची ओढ लागली आहे. मात्र, संचारबंदीमुळे दोन्ही राज्यांना जोडणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात अडकलेल्या नागरिकांना झुलाघाट, धाराचुला, बरम, बलुआकोट येथील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये ठेवण्यात आले होते. या नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती.
चार दिवसांपूर्वी नागरिकांना माघारी पाठविण्यासाठी नेपाळच्या सरकारने भारत सरकारला पत्र लिहिले होते. दरम्यान केंद्र सरकारनेही मजुरांना माघारी पाठविण्यासाठी सूट दिली. माघारी पाठविण्याची व्यवस्था केल्याने नेपाळी नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि भारत सरकारचे आभार मानले.