त्याने फेसबुकला दाखवून दिली चूक; मिळाले ५ हजार डॉलर - bug
अभियंता असलेल्या जोनलने फेसबुकच्या व्हॉईस कॉल मधील एक चूक (बग) फेसबुकला दाखवून दिली. त्यामुळे फेसबुककडून त्याला बक्षिस म्हणून ५ हजार डॉलर म्हणजे जवळपास ३ लाख ४७ हजार ५६२ रुपये मिळाले.
नवी दिल्ली - फेसबुकवर वारंवार पडिक असल्यामुळे घरच्या मंडळींचा ओरडा खावा लागणारी अनेकजण आहेत. मात्र, मणिपूरच्या जोनल सौगाईजाम या २२ वर्षीय तरुणाने फेसबुकला त्यांची एक चूक दाखवून देत लाखो रुपये मिळवले आहेत.
अभियंता असलेल्या जोनलने फेसबुकच्या व्हॉईस कॉल मधील एक चूक (बग) फेसबुकला दाखवून दिली. त्यामुळे फेसबुककडून त्याला बक्षीस म्हणून ५ हजार डॉलर म्हणजे जवळपास ३ लाख ४७ हजार ५६२ रुपये मिळाले. याबाबत जोनल म्हणाला की, माझ्या मित्राबरोबर व्हॉईस कॉल दरम्यान मला हा बग लक्षात आला आणि त्याची फेसबुकला माहिती दिली. त्यांनी तो बग मान्य केला आणि 15 दिवसांच्या आत त्यांनी त्याच्यावर उपाय काढला.
यापूर्वीही बऱ्याच जणांना फेसबुकमधील चूक दाखवून दिल्यानंतर अशाप्रकारची बक्षीसे देण्यात आली आहेत.