महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लष्कराचे यश.. गेल्या 15 दिवसात 22 दहशतवाद्यांसह 8 म्होरक्यांना कंठस्नान - top commanders

जम्मू आणि काश्मिरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांच्या माहितीनुसार, वर्षभरामध्ये वेगवेगळ्या 36 ऑपरेशमध्ये 88 दहशतवाद्यांना पोलिसांनी मारले आहे.

india army
मागच्या 15 दिवसात 22 दहशतवाद्यासंह 8 म्होरक्यांना मारण्यात लष्कराला यश

By

Published : Jun 10, 2020, 1:41 PM IST

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मिरमध्ये गेल्या पंधरा दिवसात 22 दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे 8 म्होरके मारले गेले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान ईद नंतर भारतीय लष्करांनी मोहिम हाती घेत दशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याच्या दृष्टीने रणनिती आखली. इस्लामिक स्टेट जम्मू आणि काश्मिरचा (आयएसजेके) म्होरक्या अदिल अहमद वाणी आणि लष्कर-ए-तोएबाचा (एलईटी) शाहिन अहमद यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला 25 मे रोजी यश आले. खुद हांजिपुरा भागात त्यांना कंठस्नान घातले.

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर परवेझ अहमद, जेईम कमांडर शाकिर अहमदला 30 मे रोजी वनपुरा कुलगाम भागात मारण्यात आले. तसेच 2 जूनला जैश-ए-मोहम्मदचा (जेईमएम) म्होरक्या अकिब रमजान वाणी आणि कमांडर मोहम्मद मकबुल यांचाही खात्मा करण्यात आला.

3 जूनला केलेला हल्ल्यात जेईम कमांडर फौजी भाई (निवासी पाकिस्तान), हिजबुल मुजाहिद्दीनचा वरिष्ठ कमांडर मंझूर अहमद, जेईम कमांडर जावेद अमहमद यांना कंंगण पुलवामा भागात मारण्यात आले. रेबन शोपेन भागामध्ये 7 जूनला भारतीय लष्करांनी हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर अश्फाक अहमद, जेईम कमांडर ओवेसी यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना लष्कराने कंठस्नान घातले.

दरम्यान, आणखी चार दहशतवाद्यांना 28 मे रोजी रजौरी भागात मारण्यात आले. तसेच प्रत्यक्षात मैदानात उतरून काम करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अवंतिपुरा पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू आणि काश्मिरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांच्या माहितीनुसार, वर्षभरामध्ये वेगवेगळ्या 36 ऑपरेशमध्ये पोलिसांनी 88 दहशतवाद्यांना मारले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details