श्रीनगर - नऊ वेगवेगळ्या कारवाईत गेल्या दोन आठवड्यांत 6 टॉपच्या कमांडर्ससह 22 दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सोमवारी दिली.
ते म्हणाले की, शोपियानमध्ये गेल्या दोन दिवसात नऊ हिजबुल मुजाहिद्दीन (एचएम) दहशतवादी ठार झाले. सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले.
गेल्या दोन आठवड्यांत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दल दहशतवाद्यांविरूद्ध मोहीम राबवित आहे. गेल्या दोन दिवसांत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यापैकी तीन प्रमुख कमांडर होते. ज्यांच्यावर निरपराध नागरिकांचा मृत्यू, पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ले यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.
सिंग म्हणाले की, जम्मूमधील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घुसखोरी करणारा दुसरा दहशतवादी कालाकोट सेक्टरमध्ये ठार मारला गेला. यावरून असे दिसून येते की पाकिस्तान आणि त्याच्या एजन्सी सर्व बाजूंकडून दहशतवाद्यांकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.