लखनऊ - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. मात्र, यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे, कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील बख्शीमधील राम सागर मिश्रा सौ शैय्या संयुक्त रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तब्बल 22 रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे.
सुखद ! लखनऊ येथे उपचारानंतर 22 रुग्ण कोरोनामुक्त - स्वस्थ मरीजों को किया डिस्चार्ज
उत्तर प्रदेश राज्यातील बख्शीमधील राम सागर मिश्रा सौ शैय्या संयुक्त रुग्णालयातील डॉक्टराच्या टीमने तब्बल 22 रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे.
रुग्णालयातील 63 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 22 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना येते 14 दिवस क्वारेंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेश उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी राम सागर मिश्रा सौ शैय्या संयुक्त रुग्णालयातील डॉक्टराच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
इतर राज्यातील रुग्णांना क्वारेंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबधित राज्यात परत पाठवण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांना शहरातील क्वारेंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. यामध्ये सहारनपूर येथील 12, राजस्थानच्या जयपूर येथील 2, आसाममधील 2 तर हरियाणाच्या फरिदाबाद येथील 1, अशा 17 रुग्णांचा समावेश आहे. ते सर्व दिल्लीच्या मरकझहून आले होते आणि मशिदींमध्ये लपून बसले होते. सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तपासणीत कोरोना विषाणूची पुष्टी झाल्यानंतर सर्वांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते.